पिंप्रीसेकम येथे जागतिक महिला दिनानिमित्त लढवय्या महिलांचा सन्मान:संघर्षशील महिलांना सन्मानपत्र व गुलाबफुल देऊन गौरव – चंद्रकांत चौधरी यांचे मत.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंप्रीसेकम येथे संघर्षशील महिलांचा सन्मान करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे महिलांशी संवाद साधला. ज्योती रमाकांत चौधरी यांनी महिला सन्मानार्थ सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रनिर्मात्या महिलांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.दिपनगर औष्णिक वीज केंद्राच्या राखेमुळे बाधित गाव पिंप्रीसेकम येथे ५० हून अधिक महिलांचा “संविधान अभियान जागर” उपक्रमांतर्गत सन्मानपत्र व गुलाबफूल देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदुबाई पौलाद तायडे होत्या. त्यांच्यासह गुरिंदरकौर रविंद्रसिंग चहेल, ज्योती रमाकांत चौधरी, शारदा वारके, विमल प्रल्हाद चौधरी, उज्ज्वला सपकाळे, रंजना चौधरी, जिजाबाई तायडे, कमल पाटील तसेच जि.प. शाळेच्या शिक्षिका स्नेहल सूर्यवंशी उपस्थित होत्या.

महिला लढ्याचा गौरव १४ वर्षांपूर्वी गावात डायरियाच्या साथीमुळे मोठे आंदोलन झाले होते. त्यात अनेक महिलांवर व पुरुषांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, त्यांनी न्यायालयीन लढा देऊन संघर्ष सुरूच ठेवला. तसेच, दीपनगर औष्णिक केंद्राच्या राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पंधरा वर्षांपासून संघर्ष करत राहिल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाला उड्डाण पूल, जिल्हा परिषदेची शाळा आदीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्यात आला.संघर्ष करणाऱ्या महिलांसह बचत गटाच्या महिलांनी आता दीपनगर प्रशासनाकडे आपल्या मुलांसाठी रोजगारनिर्मितीचा निर्धार केला आहे. तसेच, प्रशासन व लोकप्रतिनिधींमार्फत आपली मागणी मांडण्याचा निश्चय केला.सन्मान व शपथ ग्रहण कार्यक्रमात प्रतीभा शिंदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांनी महिलांच्या संघर्षाचे कौतुक करत त्यांच्या रोजगाराच्या लढ्यास पाठींबा दिला. सर्व महिलांनी “महिला सन्मान शपथ” घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनी केले. तर, आभार प्रदर्शन जि.प. शिक्षिका स्नेहल सूर्यवंशी यांनी केले. विद्यार्थिनींच्या वेशभूषेचे विशेष आकर्षण जि.प. शाळेतील मुलींनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या, ज्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचेही कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रविंद्रसिंग चहेल, विशाल पाटील, जितेंद्र वारके यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.