पोलिसांनी गौरव अहुजाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांनी मुलाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच मुलाने केलेल्या या किळसवाण्या कृत्यावर संतापही व्यक्त केला. “तो माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते”, असं मनोज अहुजा म्हणाले.पुण्यात महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या घटनेची भळभळती जखमी ताजी असताना आज पुन्हा एकदा पुण्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका बड्या बापाच्या मुलाने येरवडा परिसरात शास्त्रीनगर येथील चौकात आज सकाळी गाडी थांबवली. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत BMW गाडीत एक तरुण देखील होता. त्याच्या हातात दारुची बाटली होती. तर दुसरा गाडी चालक बड्या बापाचा मुलगा हा गाडीतून उतरला. त्याने केली. यावेळी रस्त्याने ये-जा करणारे नागरीक आणि स्थानिकांनी त्याला जाब विचारला. यावेळी काहींनी त्याचा व्हिडीओ देखील बनवला. यावेळी तरुणाने आखणी संतापजनक कृत्य केलं. त्याने गाडीत बसल्यानंतर कॅमेऱ्यासमोर आणि महिलांसमोर अश्लील हावभाव केले. यानंतर त्याने अतिशय वेगाने गाडी पुढे नेली.
या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. पुण्यात इतकं सारं घडत असतानादेखील पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची दखल घ्यावी लागली. या घटनेत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाचं नाव गौरव अहुजा असं आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी गौरव अहुजाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांनी मुलाच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच मुलाने केलेल्या या किळसवाण्या कृत्यावर संतापही व्यक्त केला. मनोज अहुजा हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. ते हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांच्या मुलाकडून असं कृत्य करण्यात आल्याने त्यांचीदेखील बदनामी झाली आहे. मनोज अहुजा यांनी मुलाच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना आपली उद्विग्न भावना व्यक्त केली आहे.”गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज अहुजा यांनी दिली. “तो माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. या घटनेनंतर मला पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी गाडी माझ्या नावावर आहे”, अशी देखील प्रतिक्रिया मनोज अहुजा यांनी दिली.











