धानोरा येथे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली पाटील मॅडम, आरोग्य सेविका भारती मॅडम आणि आरोग्य मदतनीस ज्योती मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष वसीम तडवी, योगेश कोळी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कामाची दखल घेतली गेली.डॉ. सोनाली पाटील, आरोग्य सेविका भारती मॅडम व ज्योती मॅडम यांच्या मेहनतीसाठी व त्यांच्या कार्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या समर्पित कार्यामुळे स्थानिक आरोग्य सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत, याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.









