रस्त्यात गाठलं, तलवार काढली अन् २० वर्षीय तरुणावर… रत्नागिरीत रात्रीच्या वेळी भयंकर घडलं.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात एका २० वर्षीय तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात एका तरुणावर धारधार तलवारीने वार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. एका वीस वर्षीय तरुणावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार आहे.रत्नागिरीतील मंडणगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कोणतेही कारण नसताना म्हाप्रळ येथे तलवारीने एका तरुणावर सपासप वार करण्यात आले. तलवारीने वार तरुन या २० वर्षीय तरुणाला जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी ७ मार्च २०२५ रोजी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (वय २० वर्ष राहणार म्हाप्रळ) असं घटनेतील पिडीत युवकाचे नाव आहे. या घटनेसंदर्भात पीडित युवकाने नोंदविलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार, ६ मार्च २०२५ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. म्हाप्रळ येथील परेरा फार्म हाऊसला जाणाऱ्या रस्त्यावर घटनेतील कथित आरोपीत तंजीम तौफिक मुकादम (राहणार म्हाप्रळ) याने घटनास्थळी दाखल होत कोणतेही कारण नसताना अहमद अब्दुल मझील मुंगरुस्करच्या डोक्यावर दोन्ही हातांच्या पंजावर तलवारीने वार केले.

तसेच, त्याला बेदम मारहाणही करण्यात आली. अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्करला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.फिर्यादीचे दुखापतीस कारणीभूत असून तक्रारीनुसार आरोपीच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात बी. एन. एस. १०९ (१) ११८ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी तंजीम तौफिक मुकादम याला मंडणगड पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पण, अशाप्रकारे कुठलंही कारण नसताना एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात दहशत माजली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.