आझाद मैदानावर वातावरण तापलं, आंदोलक मंत्रालयाच्या दिशेला जात असतानाच पोलिसांनी रोखलं.

मुंबईच्या आझाद मैदानावर चांगलंच वातावरण तापताना दिसत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांचं आज सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. पण सरकारकडून अद्यापही कोणीही प्रतिनिधी आला नसल्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले.परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेले वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात शेकडो आंदोलकांचं आदोलन सुरु आहे. आंदोलकांचं आज सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील लोकप्रतिनिधी आज मुंबईत दाखल झाले आहेत. हे लोकप्रतिनिधी मुंबई आणि मंत्रालयात कामानिमित्त तिथे व्यस्त असावेत. पण दुसरीकडे मुंबईतच आझाद मैदानावर आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या बघायला मिळत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, अशी घोषणा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

आंदोलकांकडून सकाळपासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. पण सरकारकडून अद्याप कोणीही प्रतिनिधी आंदोलकांसोबत बातचित करण्यासाठी पुढे आलेलं नाही. त्यामुळे आंदोलक हे संतप्त झाले आहेत. आंदोलकांचं भर उन्हात आंदोलन सुरु आहे. मुंबईत इतक्या लांब येऊनही सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी आझाद मैदानावरुन थेट मंत्रालयाच्या दिशेला मोर्चा नेण्याचं ठरवलं. पण पोलिसांनी आझाद मैदानाचे गेट बंद केलं. यामुळे आक्रमक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनामुळे वातावरण तापत असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे आंदोलनस्थळी दाखल झाले. विजय वडेट्टीवार हे देखील आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेलं गेट उघडण्याच प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाल्याने आंदोलक गेट उघडण्यात अपयशी ठरले. यावेळी काही आंदोलकांनी गेट चढून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर भाषण केलं. ते अधिवेशन सोडून आंदोलनस्थळी आले होते. त्यांनी आंदोलकांशी बातचित केल्यानंतर तथा भाषण केल्यानंतर ते गेटच्या दिशेला बाहेर पडताना दिसले. पण त्यांच्यापाठोपाठ आंदोलकही गेटबाहेर घोषणाबाजी करताना दिसले. संभाव्य घटना लक्षात घेता पोलिसांनी लगेच गेट बंद केलं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.”हे सरकार घाबरुन आहे. जनतेचा सामना करु शकत नाही म्हणून पोलिसांना पुढे करुन ते काम करत आहेत. या सरकारला धडा शिकवणार. अधिवेशनात हा प्रश्न मांडू. सरकारला जाब विचारु आणि या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिडे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमच्या सोमनात सूर्यवंशी याचा पोलिसांनी पोलीस कोठडीत केलेला खून आहे. याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया विजय वजेट्टीवार यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.