कंटेनरमध्ये लपवून घेत जात होतो 25 कोटींची अशी वस्तू, अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला.

 कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिल्यावर त्याला थांबवले. त्याची चौकशी सुरु केल्यावर वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे चंदनाची तस्करी करणाऱ्या माफियांचा पदार्फाश झाला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त करण्यात आले आहे. एका कंटेनरमध्ये लपवून हे चंदन नेले जात होते. पोलिसांनी ते कंटनेर जप्त केले आहे. त्यात 20 ते 25 कोटी रुपये किंमतीचे चंदन सापडले आहे. या प्रकरणात अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बंगळुरूवरुन निघालेले एक कंटनेर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या कंटनेरमधून चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या खबरीने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. पोलिसांना ते संशयास्पद कंटेनर दिल्यावर त्याला थांबवले. त्याची चौकशी सुरु केल्यावर चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.

त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी कंटेनर उघडून पाहताच पोलिसांना धक्का बसला. त्या कंटनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर चंदन लपवलेले होते. दहा ते बारा टन हे चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याची किंमत 20 ते 25 कोटी आहे.बंगळुरुमधून निघालेल्या या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई मार्गे हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवले जाणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी ते जप्त केले. या माध्यमातून चंदनाची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अर्पित सिंग या व्यक्तीला आणि वाहन चालकाला अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..