बापाने जगाचा निरोप घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघड…

धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून रिल स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आले आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुका हादरला आहे. विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय-२२, रा. भोरखेडा ता. धरणगाव ह.मु. एरंडोल) असे मयत झालेल्या रील स्टार तरुणाचे नाव आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की, विकी पाटील हा तरुण एरंडोल शहरात राहत होता. त्याचे आईवडील देखील वेगळे एरंडोल शहरात राहत होते.

त्याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते. विकी पाटील हा कुणाला काहीही न सांगता दोन दिवसांपासून बेपत्ता होता. तर दुसरीकडे मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून स्वतःचे जीवन संपविले होते. या दोन्ही घटनेचा ताळमेळ जुडवून पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.अशातच गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विकी पाटील यांचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ विकी पाटील याचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले आणि पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली.एकीकडे त्यांच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून या घटनेची माहिती दिली होती तर दुसरीकडे सुसाईड नोट प्रमाणे त्यांचा मुलाचा मृतदेह देखील आढळून आला. या घटनेमाचे कारण अद्याप किंवा मारेकरी यांच्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.