उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन.

महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून  सुरू झाला आहे. सगळीकडे  महादेवाच्या मंदिरामध्ये  लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चना करत  आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहूर्तावर यात्रा, पूजा  होत असतात. सण, उत्सव आपली परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 क्षेत्र कुणकेश्वर येथे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार रविंद्र फाटक, आमदार भैया सामंत आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि  नागपूर  ते  मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे अशाच प्रकारचा द्रुतगती महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग आपण करतोय त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन वाढीसाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाला चालना दिली तर तरुणांना जिल्ह्यातच काम मिळेल असेही ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.