कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; नाहरकत प्रमाणपत्र सादर करायची २८ फेब्रुवारी अंतिम मुदत.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; नाहरकत प्रमाणपत्र सादर करायची २८ फेब्रुवारी अंतिम मुदत. – सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५०००/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा खातेधारकांनी, खरीप २०२३ कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार व बंदपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील डिजिटलाइज्ड नसलेली गावे (Non digitalised villages) मधील खरीप २०२३ कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत,

पात्र शेतक-यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याची खातरजमा www.acagridut.mahat.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडून करुन घ्यायची आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, अशा शेतक-यांनी व चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील Non digitalised villages मधील खरीप २०२३ कापूस सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप २०२३ कापूस / सोयाबीन उत्पादक वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र दि. २८ फेब्रुवारी पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्राचा नमूना कृषि सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषि विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी कृषि विभागाची रहणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.