कोणाला टेम्पोची धडक, कुणी रेल्वेखाली आला; तिघांचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश पाहून सारे हळहळले.

रायगडमध्ये एकाच दिवसात तिघांचा अपघाती निधन झालं आहे. वेगवेगळ्या अपघातात तिघांनी जीव गमावला आहे. या घटनेने रायगडमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पेण तालुक्यात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाला टेम्पोने जोरदार धडक दिली, दुसरा मोटारसायकल अपघातात मृत्युमुखी पडला, तर तिसऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मंगळवारी सकाळी पेण तालुक्यातील दादर गावातील हरेश धनाजी पाटील (वय २०, रा. दादर) हा तरुण पायी जात असताना त्याला MH06BV4092 क्रमांकाच्या थ्रीव्हीलर टेम्पोने जोरदार धडक दिली.

या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दुपारी हमरापूर गावातील मोरीजवळ दुसऱ्या अपघाताची नोंद झाली. विवेक विष्णुदास घरत (वय ३८, रा. डावरे, ता. पेण) हा आपल्या मोटारसायकलवरून जात असताना गाडी रस्त्याकडेला घसरली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घरत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.याच दिवशी संध्याकाळी रामवाडी रेल्वे ट्रॅकवर तिसरी दुर्दैवी घटना घडली. निरंजन बाबुराव पाटील (वय २३, रा. कांदळेपाडा, ता. पेण) हा तरुण रेल्वे खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात नेमका कसा घडला, हे स्पष्ट झालेले नाही. पेण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.या तीन घटनांमुळे पेण तालुक्यात शोककळा पसरली असून युवकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्ते अपघात आणि रेल्वे ट्रॅकवरील वाढत्या दुर्घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वाहतूक आणि रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.