सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून ‘त्या’ फेरफार नोंदीचे पुनरीक्षण.

सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून ‘त्या’ फेरफार नोंदीचे पुनरीक्षण. औरंगाबाद उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका क्र. ०७/२०२४ केलेनंतर राज्य शासनाला आली जाग.! १० मार्च रोजी होणार सुनावणी जळगाव : सर्व्हे नं. २७५ वरील फेरफार नोंद क्र. ४४४० ची पुनरीक्षण (रिव्हिजन) घेण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या वादग्रस्त भूखंडातील नोंदीची फेरतपासणीसह अन्य चौकशी केली जाणार आहे. त्यावर १० मार्च रोजी सुनावणी होणार असून, त्यादृष्टीने प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी ११ जणांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वे न. 275 ची जागा भूमाफियांनी हडप केले विषयी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी मा. बॉम्बे उच्च न्यायालयाची औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका क्र. ०७/२०२४ दाखल केली आहे.

कायद्यानुसार या नोंदींची पडताळणी आणि तपासणी करण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी आहे. मात्र या भूखंडावरच्या नोंदीसह फेरफाराविषयी झालेली प्रक्रिया ६० वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी फेरफार नोंद ४४४० च्या पुनरिक्षणास परवानगी द्यावी, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. नोंदींविषयी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शासन प्रशासनाकडे तक्रार दाखल करून अनेक गंभीर प्रकार उजेडात आणले. या प्रकरणी प्रांताधिकारी गोसावी यांनी तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी, सुधाकर सुपडू सपकाळे, पद्माबाई भागवत सोनवणे, जिजाबाई मोहन पवार, योगेश सुधाकर सपकाळे, मुकुंदा भागवत सोनवणे, पंकज किशनचंद जशनानी, नितेश भरत येवस्कार व नितीनकुमार खुबचंद साहित्या यांना दि. १० मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात वादी, प्रतिवादींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जुन्या फेरफार बदलानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सुनावणीसाठी पाचारण करण्यात येणार आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.