मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ .कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड.

मांडळ ग्रामपंचायत सरपंच पदी सौ .कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड. मांडळ वार्ताहर किरण मोरे, अमळनेर : तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. कविता दीपक बडगुजर यांची सोमवारी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. मांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी आपसात ठरवल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता .त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 17 फेब्रुवारी सोमवारी ग्रामपंचायत मांडळ येथे सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली .

यावेळी सरपंच पदासाठी सौ .कविता दीपक बडगुजर यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी तथा ग्रामपंचायत समितीचे विस्तार अधिकारी गौरव यशवंत शिरसाठ ,तलाठी मधुकर पाटील ,ग्रामसेवक प्रांजल वाघ यांनी सौ. कविता दीपक बडगुजर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी माजी सरपंच व परिवर्तन पॅनल प्रमुख किरण जवरीलाल जैन ,माजी सरपंच विद्याबाई विजय पाटील, माजी सरपंच मीनल सुरेश कोळी ,माजी सरपंच कुसुबाई भास्कर पाटील, उपसरपंच सुनंदाबाई प्रताप पारधी, माजी उपसरपंच विजय सिताराम कोळी, माजी उपसरपंच हंसराज सुरेश मोरे, माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगलदास तुळशीराम कांबळे ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ .अशोक हिम्मतराव पाटील, माजी चेअरमन पंढरीनाथ विश्राम देसले ,माजी सरपंच वसंत बळीराम कोळी ,माजी मुख्याध्यापक हिम्मत काशीराम पाटील , माजी चेअरमन संतोष पुंडलिक पाटील ,काशिनाथ निंबा बडगुजर ,विजय नथू पाटील ,सुरेश लोटन कोळी,( तंटामुक्ती अध्यक्ष) राजेंद्र अण्णा धनगर, जितेंद्र पोपट पाटील, माजी सरपंच नथू भाऊराव पाटील, रावसाहेब पंडित कोळी, शेखर यशवंत पाटील ,भास्कर चैत्राम पाटील ,अरुण कोळी, संतोष कोळी ,निलेश नारायण बडगुजर ,शांताराम सखाराम कोळी ,विकास शांताराम बडगुजर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील सर्वांगीण विकासाकडे भर दिला जाईल रस्ते, पाणी, वीज याकडे लक्ष देऊन गावाच्या विकास कसा साधला जाईल याकडे लक्ष देण्यात येईल . गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वांचित सरपंच सौ. कविता दीपक बडगुजर यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.