वृद्ध दांम्पत्याला मुंबई पोलिस बोलतोय असे सांगत डिजिटल अटक केली आणि त्यांची तब्बल १८ लाखांची फसवणूक केली. अखेर ४ दिवसानंतर त्यांनी तक्रार केली मात्र तो पर्यंत फसवणूक करणाऱ्यांनी मोठी रक्कम लंपास केली होती.नवी दिल्ली: एका ८३ वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन चार दिवस डिजिटल पद्धतीने अटक केल्यानंतर १८ लाख रुपयांच गंडा घातला. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला व्हिडिओ कॉलवर डिजिटल अटकेत ठेवले आणि दोन दिवसांसाठी बँकेत पाठवले आणि खात्यात १८ लाख रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले. ज्यावेळी आरोपीने अधिक पैशांची मागणी केल्यावर, पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सेक्टर-४४ मध्ये राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डीसीपी सायबर सिक्युरिटी यांनी सांगितले. ज्या खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले आहेत ते खाते गोठवण्यास सांगितले आहे.










