ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा, विद्यार्थ्याना होणारा त्रास कमी करा : अन्यथा ठिय्या आंदोलनाचे बस व्यस्थापनाला निवेदन.

भडगाव : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक विद्यार्थिनींना तालुक्याच्या शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्या प्रमाणात बस उपलब्ध होत नसल्याने पाचोरा वाडे व पाचोरा कोळगाव या दोन मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थिनींचा प्रवास जीवघेणा झाला आहे. या मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात आणि विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारित आदर्श कन्या शाळा येथील संचालक व इतर पालकवर्गाने पाचोरा आगार अंतर्गत भडगाव येथे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. परंतु, बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बसमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना लटकून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे, या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगावचे उपाध्यक्ष विनोद महाजन,रमेश महाजन, पत्रकार सागर महाजन,मनोज महाजन,आर. आर. जाधव सर, किशोर महाजन, प्राध्यापक रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भडगाव बस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या पुढील परिणाम व सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.