शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील.

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील. आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी साधनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.पिंपळे खुर्द येथे आत्मा अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमात आत्मा समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आत्मा जळगावचे प्रकल्प संचालक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी (अमळनेर) चंद्रशेखर साठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, वैभव सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी तसेच तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक उपस्थित होते. गावचे सरपंच कैलास पाटील, उमेदचे नारायण महाजन, कांचन पाटील, सुदर्शन पाटील, मोती आप्पा, गोपीचंद पाटील, रविंद्र पाटील, गोपीचंद पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील, बंडू पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटपालकमंत्र्यांचा झाला नागरी सत्कारग्रामपंचायत कार्यलयात मंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांनी व ग्रा.पं. मार्फत शाल श्रीफळ व गुलाबाचा हार घालून भव्य नागरी सत्कार केला. प्रसंगी त्यांनी सांगितले की, गावाचे प्रेम व सत्कार सदैव स्मरणात राहील व गावासाठी निधीची निकड भासू देणार नाही. यावेळी सरपंच सौ. सुनंदा पाटील, उपसरपंच किरण पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, शाखा प्रमुख ललित पाटील, कैलास पाटील ग्रा.पं. सदस्य विनोद पाटील, जगदीश पाटील, मानसी पाटील, सुनंदा पाटील, यशंवत श्रीवंत, राजू मोरे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात आत्मा प्रकल्प संचालक कुरबान तडवी यांनी ॲग्री स्टेक शेतकरी नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगामातील पिकांवरील कीड व रोग संरक्षणाविषयी डॉ. हेमंत बाहेती यांनी माहिती दिली. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी, यासंदर्भात वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणीचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याविषयी यश वाघ यांनी सखोल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम दीपक नागपुरे यांनी केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ड्रोनद्वारे फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक विमल सुरावार, गजानन मोरे, राहुल पवार, पद्माकर पाटील, तृषिकेश रेड्डी, अक्षय पाटील, नितीन पाटील, ललित पाटील, रविंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.