प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला.

आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील 4 युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळ पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह काळापाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच त्याच्यावर अंत्यविधी केले. तसेच, आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.

उमर्दा गावातील 20 वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर,या चौघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली व त्यानंतर उमर्दा गावातील ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी काळपाणी गावातील नागरिकांनी केली. त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली व कमलसिंग पावरा याच्यासंदर्भात विचारले असता तो रात्रीच येथून पळून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावराचा शोध घेतला असता, तो दोन्ही गावच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला व नंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेत कमल सिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला. कमल सिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर उमर्दा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमल सिंग पावराचा मृतदेह थेट काळापाणी गावात नेला. त्यानंतर, त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या घरासमोरच त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी, संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड करत नुकसान देखील केले आहे.या संपूर्ण प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत 7 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.