प्रत्येक परिवारात छोटे मोठे वाद नेहमीच होत असतात मात्र परिवारातील काही वाद थेट न्यायालयात पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता एक कौटुंबिक प्रकरण मिटवण्यासाठी कोर्टाची पायरी चढलेल्या सासू -सुनेने न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकींवर हात साफ केल्याची घटना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणातील सासू -सुनेमध्ये अजिबात जमत नव्हते. त्यामु्ळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी या दोघीही आपल्या कुटुंबीयांसह नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आल्या होत्या. पण न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच सासू यमुनाबाई यशवंत निकम (58, पिंपळपट्टी, मोरे मळा, जेलरोड) व सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे (37, धुळगाव, त्र्यंबकरोड, महिरावणी) यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पाहता पाहता त्यांच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.









