इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कुल डोणगांव यांची मान्यता रद्द करण्यात यावी. चेतन आढळकर.

 RTE २५% प्रवेशित विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ मध्ये शाळेत प्रवेशास नकार देण्याचा इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कुल डोणगांव यांची मान्यता रद्द करा

यावल गटात इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कुल डोणगांव ता.यावल जि. जळगांव (यु-डायस क्र. २७०३१५०३१०२) ही स्वयं अर्थ सहाय्यीत शाळा आहे. सदर शाळेत RTE २५% प्रवेशिका विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ मध्ये शाळेत प्रवेशास नकार देण्यात आल्याबाबत सदर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा अर्ज दि. १९/०६/२०२४ रोजी यावल गटविकास अधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे. त्यानुसार सदर शाळेच्या मुख्याध्यापक यांना पत्राद्वारे जि. जळगांव या शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्याबबातचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला आहे.

तरी या शाळेचे शासनाकडून RTE २५% मोफत प्रवेश योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्ती प्रलंबित संपुर्ण रक्कम प्राप्त झाल्याशिवाय त्यांना सन २०२४-२५ या वर्षात शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही असे पत्र शाळेने यावल गट शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे. तरी यावल तालुक्यात इतर शाळा सुध्दा आहेत त्यांना सुध्दा प्रलंबित रक्कम मिळाली नसुन त्या शाळा प्रवेश देण्यात येत आहे. मग याच शाळेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे व हयाच शाळेची संपुर्ण तालुक्यातून पालकांनी तक्रार दाखल केली आहे. येत्या आठ दिवसात या शाळेत RTE२५% प्रमाणे प्रवेश देण्यात यावेत अन्यथा आम्ही सर्व पालकांना घेऊन आंदोलन करून व या शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी कारण या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा अधिकार नसुन त्या शाळेवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आरटीई कायदा २००९) मधील कलम १८ नुसार कायद्याच्या अटी व शर्तीचा भंग केल्याने त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क नियम २०११ मधील कलम १२ (ख) नुसार तपासणी समिती नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करत आहोत.

इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कुल डोणगांव यांची मान्यता रद्द करण्यात यावी. मनसे राज्य उपाध्यक्ष जनहित चेतन आढळकर

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.