मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस संपन्न
मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दिनांक 27 जुलै 2024 शनीवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये 22 जुलै ते 28 जुलै 2024 शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे.
आजचा पाचवा दिवस मिशन लाईफ शालेय पोषण दिवस इको क्लब उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा तुळशीदास सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.सुरुवातीला इको क्लबची स्थापना करण्यात आली. व गिरीष जाधव यांनी इको क्लबची माहिती सांगितली. त्यानंतर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी पाणी वाचवा पाणी जिरवा या विषयावर एक छोटीशी नाटिका सादर केली.तसेच इको क्लबमध्ये उपक्रमाची माहिती LCD प्रोजेक्टरवर दाखविण्यात आली.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पर्यावरण रक्षणार्थ तसेच PLANT FOR MOTHER उपक्रम अंतर्गत शालेय परिसरात, घराजवळ, मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केले. तसेच त्यांची काळजी घेऊन संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन गिरीष जाधव तर आभार सौ रत्ना चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.