कोर्टाचा मोठा निर्णय : ‘तू खूप सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच !

राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच आता जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये एका घटनेप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे. काय आहे प्रकरण? तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत रात्री 11 ते 12.30 दरम्यान व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. तो विविध फोटो आणि मेसेज करत असायचा. ‘तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहे. मी 40 वर्षांचा आहे, तुझे लग्न झाले आहे का? मला तू आवडतेस’, असे मेसेज हा पुरुष तक्रारदार महिलेला करत असायचा. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

 याप्रकरणी कोर्टाने 2022 रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. आज दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी आरोपीने आपली बाजू कोर्टात मांडली. राजकीय वैमनस्यातून मला या प्रकरणात अडकवले जात आहे, असे आरोपीने म्हटले. यावर न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावला. तसेच तुझ्याकडील एकही पुरावा सुद्ध होत नाही, असे कोर्टाने त्याला स्पष्ट सांगितले.कोर्टाने काय निरीक्षण नोंदवले?

कोर्टाने आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावल्यानंतर कोर्टाने निरीक्षण नोंदवले की, कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे. हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सॲप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषतः जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखत नाहीत. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे, असे म्हणत कोर्टाने फटकारले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.