पारोळा शहरातील वैभवात जुन्या हायवेच्या कामाने पडणार भर….

पारोळा शहरातील वैभवात जुन्या हायवेच्या कामाने पडणार भर…. खासदार स्मिताताई वाघ व आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते कामाचे भुमीपुज पारोळा – शहरातुन जाणाऱ्या जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ (जुना हायवे) ची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. दैनंदिन होणारी वाहतुक कोंडी, लहान-मोठे अपघात यांसह अनेक समस्यांना शहरवासियांसह या जुन्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तोंड द्यावे लागत होते. तसेच या हायवेच्या झालेल्या दुरावस्थेमुळे शहराची प्रगती खुंटली होती.इतर शहरांप्रमाणे शहरातुन जाणारा मुख्य रस्ता हा शहराचा प्रगतीत मोठी भर घालण्यागत विकसित व्हावा हे तमाम शहरवासियांचे स्वप्न आहे. याची दखल घेत पारोळा शहरातील जुना हायवे हा परिपुर्ण विकसित होण्यासाठी मा.आमदार चिमणरावजी पाटील, खासदार स्मिताताई वाघ व आमदार अमोल पाटील यांनी योग्य तो पाठपुरावा केला व काम मंजुर करून आणले.

आमदार अमोल पाटील यांच्या दुरदृष्टीने पारोळा बदलतयं या संकल्पनेला देखील आता प्रत्यक्षात सुरूवात झालेली आहे. त्यात जुन्या हायवेच्या सुधारणेच्या आज संपन्न होत असलेल्या भुमीपुजन सोहळ्याने पारोळा शहर हे प्रत्यक्षात परिपुर्ण बदलणार आहे.आज पारोळा शहरातुन जाणारा जुना हायवे (म्हसवे बायपास ते धुळे रोड कडील बायपास) ५ कि.मी.अंतराचा रस्त्याचा सुधारणेचा कामाचा भुमीपुजन सोहळा खासदार स्मिताताई वाघ व आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी पारोळा शहरवासियांनी बघितलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी या जुन्या हायवेचे काम हे अत्यंत जिव्हाळ्याचा काम आहे. हे काम गुणवत्तापुर्ण व

प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड.सतिषराजे पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, भाजपा शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, गोविंदआबा शिरोळे, मा.उपनगराध्यक्षा रेखाताई चौधरी, भगवान महाजन, मा.नगरसेवक भिमराव जावळे, गोपालशेठ अग्रवाल, प्रकाशशेठ भोई, बाजार समिती मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, देवगांव सरपंंच समिरदादा पाटील, मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, संचालक प्रकाश पाटील, भैय्यासाहेब पाटील, मा.शहरप्रमुख बापु मिस्तरी, तरडी उपसरपंच अंकुश पवार, बाहुटे येथील अतुल कदमबांडे, आडगांव सरपंच मनोहर मोरे, उपशहरप्रमुख राकेश भोसले, मन्साराम चौधरी, नितीन बारी, पारोळा शहरातील विलास वाघ, कैलास पाटील, पी.आर.वाणी, राजु पाटील, विनोद पाटील, पंकज मराठे, भिका महाजन, सतिष महाजन सर, बापु मराठे, कल्पेश जाधव, कोमल पाटील, मयुर भोई, अमोल पाटील, संजय महाजन, कैलास महाजन, विलास महाजन, ज्ञानेश्वर महाजन, विनोद पाटील, बाळु पाटील, अमोल चौधरी, अजय पाटील, प्रकाश पाटील, टेहु येथील कांतिलाल मोरे, उडणी येथील हिरामण पाटील, शिवरे येथील शाम पाटील, बाहुटे येथील मनोहर पाटील सर यांचेसह आदी मान्यवर व शहरवासिय उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.