केस ओढत मंगळसूत्र तोडलं, आरोपींना पकडायला गेलेल्या महिला पोलिसांवर जळगावात जमावाचा हल्ला.

 पिंप्राळा हुडको परिसरात बुधवारी (20 फेब्रुवारी) दुपारी एक धक्कादायक घटना घडली.रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला. ज्यात दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही या झटापटीत तुटून हरवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या महिन्यात प्रेम विवाह प्रकरणावरून विवाहित तरुणाची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील काही संशयित आरोपींना पोलीस पकडण्यासाठी गेले असता महिला पोलिसांवर हल्ला करण्यात आला. ही घटना जळगाव शहरातील हुडको परिसरामध्ये घडली आहे.

पिंप्राळा हुडको परिसरात बुधवारी (20 फेब्रुवारी) दुपारी एक धक्कादायक घटना घडली.रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला. ज्यात दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही या झटापटीत तुटून हरवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक पिंप्राळा हुडको परिसरात गेले होते. गेल्या महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही संशयित अजून फरार आहेत. याच संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते.पोलिसांचे पथक पिंप्राळा हुडकोत पोहचताच जमावाने त्यांना घेरले. आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. जमावाचा आक्रमक पवित्रा पहाता महिला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव अधिकच हिंसक झाला. जमावाने महिला पोलिसांचे केस ओढून त्यांना खाली पाडले. आणि मारहाण केली.झटापटीत स्वाती पाटील नावाच्या महिला पोलिसांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून हरवले. तर शिला गांगुर्डे या महिला पोलिसांचा जमावातील एका व्यक्तीने कडाडून चावा घेतला. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमी महिला पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा पर्यंत रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.