पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरच्या भावाची भारतात घुसखोरी, मुंबईत नजरकैदेत, नेमकं काय प्रकरण?

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर अन्वर खानचा भाऊ नादीर याची नेपाळमध्ये फसवणूक झाल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली. तो सध्या मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत आहे. पाकिस्तानमध्ये परत जाण्यासाठी मुंबई पोलिस त्याची मदत करत आहेत. मात्र, पाकिस्तानी दूतावास प्रतिसाद देत नाहीत. नादीरचे संपूर्ण कुटुंब हे पाकिस्तानमध्येच आहे. अनेकदा तो कुटुंबियांच्या आठवणीत ढसाढसा रडत असतो. मात्र, त्याला मदत मिळत नाहीये.पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा भाऊ मुंबईत वणवण फिरतोय. त्याने भारतात घुसखोरी केली. आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरच्या भावाच्या मदतीला मुंबई पोलिस धावले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अन्वर खानचा भाऊ नादीर सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहे. नेपाळमध्ये फसवणूक झाल्याने नादीर खान भारतात आल्याची माहिती मिळतंय. त्याला नेपाळ सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने मदतीच्या आशेने तो भारतात दाखल झाला. तो घुसखोरी करून भारतात आला. तो गेल्या काही दिवसांपासून मदतीसाठी मुंबईत वणवण फिरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नादीर खान हा व्यावसायासाठी नेपाळला गेला होता. तिथे त्याची दोन कोटींची फसवणूक झाली. यानंतर त्याला नेपाळ सरकारकडून कोणीही मदत मिळाली नसल्याने मदतीच्या अपेक्षेने भारतात घुसखोरी केली. दिल्लीमध्ये पाकिस्तानी दुतावासांशी संपर्क साधून त्याने मदत मागितली. मात्र, त्याला तिथेही मदत मिळाली नाही. त्यानंतर त्याने मुंबई गाठली आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने पाकिस्तानात जाता येईल का? यासाठी तो वर्षभरापूर्वी मुंबई पोलिसांकडे आला.नादीर हा घुसखोरी करून भारतात आल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सहा महिने शिक्षा भोगून नादीर बाहेर आला. सध्या त्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय. दुसरीकडे नादीरला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, याला पाकिस्तानी दूतावास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीयेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अन्वर खानचा नादीर हा लहान भाऊ आहे. अन्वर खान हा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालाय.मुंबई पोलिसांकडून नादीरची कागदपत्रे पाकिस्तानी दूतावासांना पाठण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाहीये. अनेकदा नादीर हा आपल्या कुटुंबियांच्या आठवणीत रडतो आणि त्याचे वयही जास्त झाले आहे. मदतीसाठी तो डोळे लावून बसला आहे. मात्र, त्याला कोणत्याही प्रकारची मदत ही मिळत नाहीये. नादीरचे संपूर्ण कुटुंबिय पाकिस्तानात आहे. मुंबई पोलिस मदत करतील, या अपेक्षेनेच तो मुंबई पोलिसांना शरण आला. पाकिस्तानच्या अनेक मोठ्या राजकिय नेत्यांसोबत त्याचे संबंध आहेत, तरीही त्याला अद्याप मदत ही मिळू शकली नाहीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.