पहाटेच्या सुमारास भरधाव खासगी बसने घेतला पेट ; थोडक्यात १६ प्रवासी बचावले !

राज्यातील अनेक महामार्गावर अपघात व आगीच्या घटना घडत असतांना आता खान्देशातील धुळे जिल्ह्यातील सोनगीर-डांगुर्णेदरम्यान बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास खासगी बसने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी होते. संबंधित बस वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून लग्नाचे वन्हाड घेऊन शहाद्याला जात होती. बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी साइडला लावून सर्व प्रवाशांना झोपेतून उठवून खाली उतरवले. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. मात्र तोपर्यंत लक्झरी बससह सर्व वन्हाडींचे सामान जळून खाक झाले होते.

सविस्तर वृत्त असे कि, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील लग्नाचे वन्हाड घेऊन एमएच १२ केक्यू ४३४५ क्रमांकाची खासगी बस १५ वऱ्हाडींना घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लग्नाला जात होती. पहाटे सोनगीर ते डांगुर्णेदरम्यान बसच्या पुढील हेडलाइटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने धूर निघत असल्याचे लक्झरीचे चालक रघुनंदन तडस यांच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून गाडी साइडला उभी केली.रघुनंदन तडस यांनी बसमधील सर्व वन्हाडी मंडळींना साखरझोपेत असताना उठवले आणि बसखाली उतरवले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले आणि बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. धुळे येथील या घटनेची माहिती कंट्रोल रूमला अज्ञात कोणी तरी दिली, त्यानुसार शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दुष्यंत महाजन व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. आगीत प्रवाशांचा सर्व सामान जळून खाक झाला आहे. या घटनेची फिर्याद अद्याप शिंदखेडा पोलिसांत दिली नसल्याने नेमके किती नुकसान झाले हे कळू शकत नाही

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.