दुचाकी वाहनांकरिता नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस २४ डिसेंबर पासून सुरुवात.

दुचाकी वाहनांकरिता नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस २४ डिसेंबर पासून सुरुवातनविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकांसाठी २४ व २५फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनजळगाव  :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-१९/ईक्यू ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयात दिनांक २४ व २५फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज दुपारी ४.०० वाजेपर्यंत जमा करायची आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे, त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक असणार आहे.दिनांक २४ व २५फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दिनांक २५फेब्रुवारी २०२५ रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक २५फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत २७ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
बंद लिफाफे हे २७ फेब्रुवारी रोजी ४.३० वाजता सहाय्यक /उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील असे जळगावचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.