केळीला फळाचा दर्जा मिळावा…खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी..

केळीला फळाचा दर्जा मिळावा…खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी..

जळगांव जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्न असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खा.स्मिता वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे केली.जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे ह्या पिकांच्या उत्पादक शेतकरी वर्गाला निर्यात,शासकीय सवलती,पीक विमा तसेच बाजारभावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती.ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खा.स्मिता वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले.ह्या पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर ह्या केळी उत्पादक शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खा.वाघ यांनी केली.

दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने ह्या मागणीला आता यश येणार असल्याने खा.स्मिता वाघ यांचे केळी उत्पादक परिसरात आभार व्यक्त होत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.