जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनविषयक समस्या तात्काळ सोडवा.– जुक्टो संघटनेची मागणी.
जुलै रोजी जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म.वि. शिक्षकांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची श्री.राजमोहन शर्मासाहेब (अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक) यांच्या कार्यालयात सहविचार सभा पार पडली. या बैठकीत
१) गेल्या कित्येक वर्षात वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांना थकबाकी मिळणे अद्याप प्रलंबित.
२)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा ३रा, ४था हप्ता अद्याप मिळालेला नाही.
३) काही कर्मचाऱ्यांना अद्यापही ६ व्या वेतन आयोगाच्या काही थकीत हप्त्यांची रक्कम मिळालेली नाही.
४) NPS धारकांना त्यांच्या जमा रकमेचा आजपर्यंतचा अचूक हिशोब मिळावा.
५) १५ मार्च २०२४नंतर जमा केलेल्या वैद्यकिय बिलांची व थकीत बिलांची तात्काळ पूर्तता व्हावी.
७)शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे मानधन तात्काळ खात्यावर जमा करणे.
८)काही उ.मा.वि./क.म. वि.चे नियमित वेतनधारक मात्र आजअखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ जमा करावे.
या विषयांवर साधक बाधक चर्चा करून श्री. शर्मा साहेबांनी अजेंड्यावरील प्रत्येक समस्येचे निराकरण करून संघटनेला यथायोग्य सहकार्य करून शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांच्या कार्यालयाने यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेले असल्याचे संघटना प्रतिनिधींना अवगत केले. यासह वेतन पथक कार्यालयात असलेल्या तोकड्या मनुष्यबळाकडे देखील त्यांनी संघटनेचे लक्ष वेधत संघटनेच्या वतीने पदवीधर,शिक्षक आमदार महोदयांच्या माध्यमातून मा.शिक्षण संचालक कार्यालयात पाठपुरावा करून उ.मा.वि./ क.म.वि.चे वेतन विषयक व तत्सम काम बघण्यासाठी एक स्वतंत्र वरीष्ठ लिपिक तसेच गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले सहाय्यक लेखाधिकारी पद तात्काळ भरावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा.श्री.नंदन वळींकार, प्रा. सुनील सोनार (सचिव), प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष),प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा. राजेंद्र चव्हाण (सहसचिव) प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष) प्रा.शशीकांत पाटील (पारोळा तालुकाध्यक्ष), प्रा.संजय चौधरी (से.नि.प्रतिनिधी), प्रा.विपीन चौधरी, श्री. ललित किरंगे, श्री. सागर कोल्हे, प्रा.एस. एच.जोशी उपस्थित होते. प्रा.श्री.राहुल वराडे यांनी आभार प्रदर्शन केले.