आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कोणाचे? DNA अहवालातून स्पष्ट, पोलिसांच्या तपासाला यश

आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कोणाचे? DNA अहवालातून स्पष्ट, पोलिसांच्या तपासाला यश (फोटो सौजन्य-ट्विटर)

मुंबईतील मालाड परिसरात आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाच्या डीएनए चाचणीचा अहवाल समोर आला आहे.

या अहवालात हे बोट इंदापूर येथील एका कारखान्यातील कामगाराची असल्याचे सिद्ध झाले आहे. ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फॅक्टरीतील आईस्क्रीम पॅक करण्याचे काम करत असताना ओमकारच्या बोटाला अपघात झाला. यानंतर ओमकारचे मधले बोट तुटून आईस्क्रीमच्या कोनमध्ये पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 मे 2024 रोजी ओंकार पोटे यांच्या उजव्या हाताचे मधले बोट आईस्क्रीम पॅक करताना कापले गेले होते. आईस्क्रीम कोनवर बनवण्याची तारीख देखील त्याच दिवसापासून होती. या खुलाशानंतर मुंबई पोलिसांनी फॉर्च्युन कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

13 जून रोजी मालाड येथील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय डॉ. ओर्लेम ब्रँडन सेराव यांनी ऑर्डर केलेलं बटरस्कॉच आईस्क्रीम त्यांच्या बहिणीने अर्धे भाग खाल्ले, त्यावेळीस त्यांना वेगळी चव जाणवली. त्यानंतर आईस्क्रीमचा कोन नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये मानवी बोट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यांनी आईस्क्रीम कंपनीच्या इन्स्टाग्राम पेजवर तक्रार नोंदवली, मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने सेराव यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या प्राथमिक तपासात सांगितले की, आइस्क्रीममध्ये मानवी बोट होते आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते.

तपासादरम्यान पोलिसांना हे बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हे बोट याच कर्मचाऱ्याचे आहे का? हे तपासण्यासाठी डिएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल सादर करण्यात आला असून, हे बोट पोटे या कर्मचाऱ्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.