बस आगारात संत सेवालाल महाराजांना अभिवादन. नंदुरबार : जगाला शांतीचे संदेश देणारे
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार येथे अभिवादनासह प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जितेंद्र जाधव, ज्ञानेश्वर गवळे, आगार प्रमुख संदीप निकम, वाहतूक नियंत्रक प्रल्हाद राठोड, स्थानकप्रमुख पाडवी, अकाउंटंट बाविस्कर, डी.एम.गायकवाड, जगदीश राठोड, प्रशांत गुजराती, संतोष पवार, ईश्वर जाधव आदींसह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संतश्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. जगदीश राठोड यांनी सेवालाल महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी संतश्री सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. इतर समाजानेही त्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले









