जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.जळगाव,: सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या नमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माझी मंत्री आ. अनिल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश भोळे ( राजूमामा ) , मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन,

कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स किंवा अन्य स्पर्धांमध्ये देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. मात्र, मातीवरील कुस्तीमध्ये आपल्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खेळाडू खाशाबा जाधव होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवत परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे.”या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने या स्पर्धेची रंगत अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. “गिरीशभाऊ हेही कुस्तीपटू होते आणि त्यांनी विद्यापीठस्तरीय कुस्तीत उत्तम कामगिरी केली होती. आता राजकारणातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे!” असे मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

“आजच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी परदेशी खेळाडूंवर मात करत विजय संपादन केला. त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल गिरीश महाजन यांचेही मनःपूर्वक कौतुक करतो. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत स्पर्धेचा आनंद घेतला, हेच या स्पर्धेच्या यशाचे खरे लक्षण आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी अशा नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. अशा दर्जेदार स्पर्धांचे आयोजन जामनेरमध्ये होणे, हे कुस्तीच्या वाढीसाठी उत्तम वातावरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या कुस्तीपटूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला कुस्तीगीर, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.