शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगावतर्फे निषेध करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे निषेध करण्यात येत आहे. शेतकरी हा स्वतः काबाडकष्ट करतो स्वतः कमवतो आणि पूर्ण जगाचा पोशिंदा त्याला जी उपमा मिळालेली आहे ती कोणाच्या मेहरबानीने किंवा कोणत्याही सरकारने दिलेल्या योजनेतून मिळालेली नाही त्याचा तो हकदार आहे.
शासनाला शेतकऱ्यांविषयी कुठलेही योग्य प्रकारे धोरण ठरवता येत नाही त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जाहीर करून सुद्धा त्या हमीभावाने खरेदी केली जात नाही, खरं तर शेतकऱ्यानी कोणत्याही प्रकारची मागणी सरकारला केलेली नव्हती सरकारचे धोरण चुकत असल्यामुळे सरकारवर नाराज असल्यामुळे सरकारने या योजनेला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना प्रलोभन देण्यात आले आम्ही एक रुपया मध्ये विमा देऊ खरंतर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा हिच शेतकऱ्यांची इच्छा आहे.सरकारची यंत्रणा योग्य नसल्यामुळे भ्रष्टाचारास चालना मिळाली आहे आणि दोष शेतकऱ्याला देण्यात येत आहे.
बऱ्याच योजना निवडणुकीचा स्टंट म्हणून लागू करण्यात आल्या होत्या आणि आता त्या योजनांवर कात्री आणण्याचा प्रयत्न करत आहात कोणत्या तरी प्रकारे त्या योजनेमधून लाभार्थींना बाद करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा निदर्शनात येत आहे.तमाम शेतकऱ्याची कृषी मंत्राने माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल . अविनाश पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना









