युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, श्रीमती रक्षा खडसे यांचा 14 व 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम. युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी
सकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून प्रस्थान, सकाळी 11 वाजता जळगाव येथे आगमन, सकाळी 11 ते दुपारी 1 – आंतरजिल्हा युवक विनिमय कार्यक्रमात सहभाग (जळगाव), दुपारी 1 वाजता जळगावहून मुक्ताईनगरकडे प्रयाण,
दुपारी 1.30 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन, सायंकाळी 4 ते 6 पर्यंत कार्यकर्त्यांसोबत बैठक (रेसिडेन्शियल कॅम्प ऑफिस, मुक्ताईनगर), रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगरहून जळगावकडे प्रयाण,सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत कार्यकर्त्यांसोबत बैठक (भाजप कार्यालय, जळगाव), दुपारी 3 वाजता जळगावहून मुक्ताईनगरकडे प्रयाण, दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, सायं. 4 ते 6 पर्यंत निवासी कार्यालय, मुक्ताईनगर येथे कार्यालयीन कामकाज, मुक्ताईनगर येथे मुक्काम.









