राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ .१३ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सादर करता येणार अर्ज  राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १०० % अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत भुईमुग पिकासाठी कोल्हापूर / सातारा / सांगली / पुणे / अहिल्यानगर / नाशिक / धुळे / छत्रपती संभाजी नगर या ८ जिल्ह्यांतील शेतक-यांना व तीळ पिकासाठी जळगाव / लातूर / बीड / बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे.याकरिता महाडीबीटी च्याhttps://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या विभागा अंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करण्यासाठी १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी यात सहभाग वाढवावा यासाठी ही मुदत दि. १३ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेंतर्गत लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.