आई – वडिलांचा श्वास हृदयात जपा : प्रा.वसंत हंकारे ०६ फेब्रुवारी, २०२५ रोजी वाढदिवसाच्या औचित्याने एरंडोल येथे नाते लेकीचे आणि माता – पित्याचे आजची सामाजिक गरज खास महिला व मुलींसाठी काळजाला भिडणारे न समजलेले आई – बाप समजुन घेतांना सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंतजी हंकारे यांचा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या युगात आईच्या यातना व बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आई-वडिलांचा श्वास नेहमी हदयात ठेवावा. मुलगा किंवा मुलीचे वाकडे पाऊल पडले, तर अंत्यसंस्काराच्या चितेवर जाण्यापूर्वीच बापाची घरात आणि मनात रोजच चिता जळत असते, असे विचार प्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी एरंडोल तालुक्यासह इतर ठिकाणांहुन आलेले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. हंकारे यांचा भावनिक व हृदयस्पर्शी संवादावेळी उपस्थित सर्वांच्याच अश्रूचा बांध फुटला गेला.









