नाशिक शहरातुन मो. सा चोरी करणारा आरोपी जळगांव स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..
महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगांव, यांनी बबन आव्हाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील वाहन चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे बबन आव्हाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांना मो.सा चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिल्याने त्याप्रमाणे नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी संशयीत आरोपी नामे कुणाल ललीत तिवारी वय -१९ एस.टी वर्क शापॅमागे लक्ष्मण भाऊ नगर जळगांव यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन त्याने सुमारे एक ते दिड महीन्यापुर्वी त्याने नाशिक रोड पोलीस स्टेशन. सीसीटीएनएस गु.र.नं.३८५/२०२४ भादंवि क. ३७९ हा गुन्हा केला असुन त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली मो.सा एमएच १५ एचके २९६५ क्रं.चे होंडा कंपनीची मो.सा सुमारे २५,०००/- रू, किं.चे त्याचे कडुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणुन त्यास पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन. चे अंमलदार यांचे ताब्यात दिले आहे..









