ट्रक्टर वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार यास स्थानिक गुन्हे शाखा, यांनी केले जेरबंद…..

महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगांव, यांनी बबन आव्हाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना जळगाव शहरात व जिल्हयात वाहन चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे बबन आव्हाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे पोलीस अंमलदार- जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांना वाहन चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिल्याने त्याप्रमाणे नमुद पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रमेश उर्फ अनिल काशीनाथ सोनवणे वय-३२ रा. सावखेडा बु।। भिलाटी ता. जि. जळगांव याने सुमारे ०४ ते ०५ महीन्यापुर्वी जळगांव तालुक्यातील सावखेडा बु।। गावातुन एक ट्रक्टर वाहन चोरी केल्याची गुप्त माहीती मिळवुन त्यास आज रोजी ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता त्याने जळगांव तालुका पो.स्टे. सीसीटीएनएस गु.र.नं.२२२/२०२४ भादंवि क.३७९ प्रमाणे दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले असुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले एमएच १९ ए.पी ५०७६ क्रं.चे वाहन ट्रक्टर सुमारे २,५०,०००/- रू, किं.चे त्याने चोरी केलेले ट्रक्टर त्याचे कडुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणुन त्यास पुढील कारवाई कामी जळगाव तालुका पो, स्टे ला हजर केले आहे










