सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन. भैय्यासाहेब गंधे सभागृह जिल्हा पेठ जळगाव येथे रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना मा. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.  ॲड आशिष शेलार यांची असून,  विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा माहिती अधिकारी  युवराज पाटील, लोक कलाकार विनोद ढगे,  वसंतराव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विवेकानंद कुलकर्णी तसेच सहसंचालक श्रीराम पांडे हे हजर होते.

प्रस्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले तर या महोत्सवास जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 02 फेब्रुवारी, 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 3 फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्‍न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होणार आहे मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्‍मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे तर पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांचे बासरी सहगायन व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत कलाकार आपली शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.