नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वासही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी व्यक्त केला.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री   फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे हे साहित्य संमेलन निश्चित भव्य असे होईल. हे संमेलन देश नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांकरीता अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने त्याला विशेष महत्व आहे. असून यासाठी महाराष्ट्र शासन पाठीशी असल्याचे, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मराठी साहित्यिक उत्साही असून हे संमेलन विचारप्रर्वतक ठरेल असे सांगून या साहित्य संमेलनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीतील मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कारदरम्यान, बुधवारी सांयकाळी दिल्लीतील विविध मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी दिल्लीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या मराठी लोकांनी मुख्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून दिल्लीतील मराठी मंडळांसाठी आणि येथील वास्तुंसाठी निश्चित योग्य ती पाऊले उचलली जातील असे आश्वासन दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.