दुर्दैवी! शनीदेवाच्या दर्शनाला निघाले, पण काळाने वाट अडवली; अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू.

कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नस्तनपूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी नांदगाव-चाळीसगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नस्तनपूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी नांदगाव-चाळीसगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील भाऊसाहेब बंडू माळी (वय ४५) व मंगलबाई भाऊसाहेब माळी (वय ४०) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.दरम्यान, कारचालक जखमी असल्याने कारबाबत व त्यात कितीजण होते, याबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे नांदगाव पोलिसांनी सांगितले. अपघातात ठार झालेले पती-पत्नी नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या नजीक पिंपराळे येथील आहेत.

नांदगाव-चाळीसगाव मार्गावर पिंपरखेड शिवारातील टोलनाक्यासमोर चाळीसगाव येथून नांदगावकडे जाणाऱ्या कारची (एमएच २० जीके ६४५७) दुचाकीला (एमएच १५ बीआर ७०८५) ला जोरदार धडक बसली.हा अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकीवरील भाऊसाहेब बंडू माळी व मंगलबाई भाऊसाहेब माळी हे जागीच ठार झाले, तर दुचाकी चालवत असलेला अमोल भाऊसाहेब माळी (वय २५) तसेच कारचालक असे दोघे जखमी झाले आहेत. दोघांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातात दुचाकीचे व कारचे मोठे नुकसान झाले असून, कार अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहायक निरीक्षक सुनील बढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस कर्मचारी व नागरिक यांच्यासह मदतकार्य केले. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास सुरू आहे.

ऊसतोड कामगाराचे दर्शन अपूर्णचऊसाच्या शेतात मजुरी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील भाऊसाहेब माळी व मंगलबाई माळी या दाम्पत्याला नस्तनपूर येथे शनीदेवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा झाली. मुलगा अमोल याला त्यांनी बरोबर येण्यास सांगितले. अमोल दुचाकीवरून आई-वडिलांना घेऊन निघाला. पण त्याचा आई-वडिलांसोबतचा हा प्रवास अखेरचा प्रवास असेल, असे त्याच्या ध्यानीमनीही आले नसावे. त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर आप्तेष्ट होते पण अमोल चालवत असलेल्या दुचाकीला कारने धडक दिली व होत्याचे नव्हते झाले. आई-वडिलांचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने अमोल सैरभैर झाला. त्यांची छोटीशी झोपडी आई-वडिलांविना त्याच्यासारखीच पोरकी झाली. देवाचे दर्शन घेण्यापूर्वीच काळाने त्याच्या आई-वडिलांना गाठले. दर्शन तर राहिलेच, पण पालक गमावल्याचे दु:ख अमोलला पचवने अवघड जाणार आहे.

  • Related Posts

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार..

    राजकारणाचा बाजार? ‘मतदार राजा’ कुठाय? संजय सुतार विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नेत्यांनी रोजच राजकारणाचा बाजार मांडायचा आणि आम्ही त्यांच्या तालावर नाचायचं असं अजून कुठंवर चालणार? याचं कोडं काय सुटेनासं…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.