दिनांक 29/01/2025 रोजी सकाळी 03.45 वाजेच्या सुमारास मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार कोरपावली गाव परिसरात गस्त करून तपास केला असता पाला पाचोळ्यात लपवलेले साग कट साईज नग – 6 घ. मी. 0.112 माल किम्मत ₹ 2266/- मिळून आले. सदर गुन्हे कामी वनपाल गस्ती पथक यांनी प्र. रि. क्रमांक 02/2025 दी. 29.01.2025 नोंदविला जप्त माल मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केला.
सदर कार्यवाही म.जमीर शेख साहेब, उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, व म. आर.आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच प्रथमेश हळपे साहेब सहा. वन
संरक्षक चोपडा व समाधान पाटील साहेब सहा.वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही म. वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक यावल स्व. म. फटांगरे सर, आर. एम. जाधव वनपाल, आर. व्ही. ख़र्चे वनपाल, बी. बी. गायकवाड आगार रक्षक यावल, सचिन तडवी पोलीस कांस्टेबल, वाय. डी. तेली वाहन चालक यांनी केली.








