भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे.
टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जवळपास 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ही मारहाण केली. या घटेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष सुरु होता. मात्र नांदेडमध्ये विजयानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसत एका टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय आगे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात शनिवारी रात्री ही घटना घडली. शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी श्रीनगर भागात गजानन देगलुरकर यांच्या इमारतीत भाड्याने राहतात. काल रात्री भारत जिंकल्याने इमारतीच्या गच्चीवर विदयार्थी जल्लोष करत होते. तेव्हा गोधळ का करता म्हणुन 20 ते 25 युवक इमारतीत घुसले. त्यानी दरवाजाची तोडफोड केली. काही विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.









