सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक.

सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक. ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ( (HSRP) घेण्यापुर्वी आपले वाहन संगणक प्रणाली Vahan ४.० वर आहे का याची खात्री parivahan.gov.in साईटवर भेट देवून करावी तसेच आपला मोबाईल संगणक प्रणालीवर आपल्या वाहनाचे माहितीशी जोडला गेला आहे याची वाहन संगणक प्रणाली vahan. ४० खातरजमा करावी तसे नसल्यास संबंधित नोंदणी प्राधिकरणाशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करावी.असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याकरिता https://transport. maharashtra.gov.in या लिंकचा वापर करायचा आहे.

या जिल्ह्यातील सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालय , बँका, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्थांना आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे अनिवार्य आहे.दुचाकी वाहन व ट्रॅक्टरकरिता ४५० रुपये, तीन चाकी वाहनाकरिता ५०० रुपये व सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. अधिकृत HSRP फिटमेंट केंद्रावर वाहन मालकांना HSRP बसविण्याची सेवा नाकारता येणार नाही. तसेच वाहनाकरीता अदा केलेली रक्कम केवळ ३ महिन्यानकरीता वैध राहणार आहे. अधिक माहिती करिता 91-9510973540 या क्रमांकावर किंवा sachin.naige@hsrp.in या मेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहन वाहनधारकांना करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.