रावेर वनविभागाची मोठी कारवाई अवैद्य रीतीने सागवानाची तस्करी करणारे बोलेरो पिकप पकडले.

रावेर वनविभागाची मोठी कारवाई अवैद्य रीतीने सागवानाची तस्करी करणारे बोलेरो पिकप पकडले.दिनांक-27/01/2025 रोजी रात्री 11.00 वाजेच्या सुमारास माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सावदा ते तांदळवाडी रस्त्याने गस्त करीत असताना मौजे तांदळवाडी गावाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकप संशयास्पद आढळून आली त्या वाहनाचा पाठलाग सदर टीमने केला. सदर वाहनाचा वाहन क्रमांक MH 04 GF-7263 या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात 25 साग इमारती नगांचा माल आढळून आला. माला विषयी वाहन चालक नामे युवराज सिताराम तायडे वय वर्ष 35 राहणार मांगलवाडी यांना माला विषयी लागणाऱ्या परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले, सदर सागवान इमारती मालाचे मोजमाप रावेर आगार डेपो येथे वाहन चौकशी दरम्यान घेण्यात आले .

सदर मोजमाप =1.221 घ. मी. एवढी असून ,मालाची किंमत= 43116रुपये असून. ताब्यात घेतलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकप गाडीची किंमत अदमासे=3,45,000 सदर गाडीतील सागवान इमारती लाकूड व वाहनाची एकूण किंमत=3,88,116 एवढी असून सदरील वाहन व त्यामधील सागवान इमारती लाकूड अवैधरित्या वाहतूक करताना रंग्गेहात पकडल्याने भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम-41(2) ब,42,52 या कलमांचे उल्लंघन झाल्याने आगार रक्षक रावेर यांच्याकडील प्रथम रिपोर्ट क्रमांक 02/2025 दिनांक 27/01/2025 रोजी गुन्हा जारी केला. तसेच पुढील चौकशी कामे सदर वाहनआगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही ,निनू सोमराज मा. वनसंरक्षक धुळे (प्रा.) वनवृत्त धुळे, जमीर शेख मा. उपवन संरक्षक, यावल वन विभाग जळगाव, आर.आर.सदगीर सर मा. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच प्रथमेश हडपे साहेब सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान पाटील साहेब सहायक वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय नारायण बावणे सर, आगार रक्षक सुपडू सपकाळे,  जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील तसेच 5)विशेष पेसा वनरक्षक रावेर रेंज यांच्या पथकाने सदर कारवाई पार पाडली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.