जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले आहे.त्याचे उदघाटन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

या नव्या कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, लेखाधिकारी यांचे दालन, कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्था, तसेच कार्यालयीन सुविधा उभारण्यात आल्या आहेत.नूतनीकरणानंतर कार्यालयाची उत्कृष्ट बैठक व्यवस्था आणि आधुनिक सुविधा पाहुन सर्व मान्यवरांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नियोजनाचे कौतुक केले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील इतर कार्यालयांचेही नूतनीकरण करून सुसज्ज करण्याची यावेळी सूचना दिली.
सध्या जिल्हा नियोजन समिती कार्यालय नूतनीकरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज झाले आहे. बैठकीसाठी स्वतंत्र दालने, कर्मचारी वर्गासाठी सुविधा, आणि कामकाज सुटसुटीत होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.