मित्राच्या हत्येच्या बदल्याचे भूत डोक्यावर स्वार अन् दुर्गेशने हर्षला निर्घृणपणे संपवले; हत्या सत्राने नागपूर हादरले.

 मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर शहरात हत्येची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत तिसरी हत्येची घटना घडली आहे. ज्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहेमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर शहरात हत्येची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत तिसरी हत्येची घटना घडली आहे. ज्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील पारडी पोलीस ठाणे अंतर्गत चंद्रनगरमध्ये शनिवारी, मित्राचा हत्येचा बदला घेण्यासाठी पाच मित्रांनी एका तरुणाची चाकूने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.हर्ष राजू शेंडे (वय २२, हिवरी नगर, नंदनवन) असे मृतकाचे नाव आहे. तर दुर्गेश रारोकर (वय २५, भांडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०२२ साली मृतक हर्ष शेंडे आणि त्याचा चार मित्रांनी मिळून डिजेवर नाचण्यावरुन झालेल्या भांडणात अभिषेक हुमने या तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर अभिषेक हुमने याचा मित्र दुर्गेश हर्षवर चिडून होता. दुर्गेश अनेक दिवसांपासून आपल्या मित्राच्या हत्येचा बदला घेण्याचा तयारीत होता.दरम्यान, शनिवारी दुपारी ३ वाजता हर्ष शेंडे चंद्रनगर चौकात एकटा उभा असल्याची दुर्गेशला समजले. त्यानंतर दुर्गेशने आपल्या चार मित्रांनाही तिथे बोलावले आणि सर्वांनी मिळून हर्षसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी हर्षवर चाकू आणि तलवारीने वार करून त्याची हत्या केली. नंतर घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी हर्षची भरदुपारी चौकात हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

या प्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये हत्येची मालिका आणि वाढत्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि असुरक्षतेचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेची स्थिती गंभीर बनली आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.