सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा.

सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छासर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. त्यासाठी निर्धार करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे. आगामी काळात ‘डेटा सेंटर’चे ‘कॅपिटल’ होणार आहे. आपले एमएमआर क्षेत्र जागतिक ‘ग्रोथ सेंटर’ होणार आहे. जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र ‘मॅग्नेट’ आहे. या सगळ्या शक्तिस्थळांमुळे महाराष्ट्राचे भारतीय अर्थव्यवस्था शक्तिशाली करण्यात अनन्य साधारण योगदान राहणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही. शेती – सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा यांसह पायाभूत सुविधा क्षेत्रांत महाराष्ट्राने आतापर्यंत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. सामाजिक न्यायाच्या बाबतीत ही महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदलात समतोल राखण्याचे भान- संवेदना जतन केली आहे. महाराष्ट्राचा हाच लौकीक आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी एकजूट करायची आहे.आपले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली करायचे आहे. त्यासाठी सर्व भेद बाजूला ठेवून, परस्पर स्नेह, सौहार्द वाढवूया. सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम भारत घडविण्याचा संकल्प करूया. आपल्या पुर्वसुरींना दिलेला राष्ट्रप्रेमाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करूया असे आवाहन करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..