स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन.

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन.राज्य शासनामार्फत ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून एकूण 76,875 ई-श्रम कामगारांची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय, जळगाव या कार्यालयास प्राप्त झालेली आहे.
प्राप्त माहिती ही तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली आहे. त्यापैकी यादीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध नसलेल्या कामगारांची संख्या 18,243 एवढी आहे. शासनाकडून प्राप्त व उपलब्ध माहितीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या ई-श्रम कामगारांची संख्या 58,632 एवढी आहे. त्यापैकी 51,302 इतक्या कामगारांसोबत संपर्क करण्यात आलेला आहे. तसेच 7330 कामगारांशी काही अडचणींमुळे संपर्क होवू शकलेला नाही.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या परंतु रेशनकार्ड नसलेल्या कामगारांनी आपल्या नजीकचे तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे. यामुळे त्या कारगारांना शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार आहे. कामगारांनी नवीन शिधापत्रिकेकरीता आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. तसेच, ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे अशा कामगारांनी त्यांच्या शिधापत्रिका प्रकाराची माहिती नजीकच्या तहसिल कार्यालयात द्यावी जेणेकरून शासनास आपली माहिती कळविता येईल. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.