बोट कापलं अन् रक्त भांगेत भरलं, मग दोघांनीही एकत्र जीव दिला, प्रेमाचा हृदयद्रावक अंत.

एका प्रेमी युगुलाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यापूर्वी त्यांनी डायल ११२ वरह कॉलही केला होता. पण, याप्रकरणी पोलिसांना अनेक बाबींवर संशय आहे. त्यामुळे सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने गळफास घेत एकत्र आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील चिरैया पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. पण, जेव्हा कुटुंबाला या दोघांच्या नात्याबाबत कळालं तेव्हा त्यांनी यांनी भेटण्यासही मनाई केली. तरी, ते घरच्यांचा विरोध झुगारुन लपून लपून एकमेकांना भेटू लागले. मात्र, एक दिवस त्या दोघांना मुलीच्या घरच्यांनी पाहिलं आणि मग मुलीला घरातून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली. अखेर या दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी एकत्रच गळफास घेत आत्महत्या केली.

याप्ररकणी मिळालेल्या माहितीनुसार, चिरैया पोलीस स्टेशन परिसरातील राजदेव पासवान यांचा २१ वर्षीय मुलगा अमित कुमार याने याच गावातील एका मुलीसोबत गळफास घेत आयुष्याची दोर कापली. हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. तेव्हा शाळेतच त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते दोघांनाही कळले नाही. शाळा सुटल्यानंतर दोघेही अनेकदा भेटत असत. मात्र अलीकडेच मुलीच्या कुटुंबीयांनी या दोघांना फिरताना पाहिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही खडसावलं आणि मुलीचा मोबाईलही हिसकावून घेतला. जेणेकरून मुलगी पुन्हा त्या मुलाला भेटू नये, संपर्क करु नये.पण, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडालेले होते, की एकमेकांपासूनचा विरह त्यांना सहन होत नव्हता. त्यामुळे ते दोघेही घरातून पळून गेले, त्यांनी रात्री उशिरा आंब्याच्या बागेत जाऊन एकत्र गळफास घेतला. जीव देण्यापूर्वी या मुलाने आपलं बोट कापलं आणि मुलीच्या भांगेत रक्त भरल्याचं आढळून आलं. पण, यासर्वात एक प्रश्न उपस्थित होत होता की, हे दोघे इतक्या उंच झाडावर गळफास कसा घेतला.आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वी अमितच्या मोबाईलवरून डायल ११२ वर कॉल करण्यात आला होता. मी मरणार आहे, जर तुम्ही मला वाचवू शकत असाल तर या आणि मला वाचवा, असं तो म्हणाला. त्यांनतर त्याचं लोकेशन ट्रेस करून पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत उशीर झालेला होता. तोपर्यंत हे दोघेही मृत्यूमुखी पडले होते.अमितच्या ज्या मोबाईलवरुन डायल ११२ वर कॉल केला गेला होता तो घटनास्थळावर सापडलेला नाही. त्यानंतर पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर अमितच्या भावाकडून तो मोबाईल जप्त केला. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली की दोघांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवण्यात आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.