शेतकऱ्याच्या विहिरीतून केबल चोरी भोवली : पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

जामनेर तालुक्यातील पहूर येथील पोलिस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून केबल चोरी करणाऱ्या नेरी दिगर येथील एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २० हजारांची तांब्याची तार जप्त केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहुर पोलिस ठाण्यात सुधाकर देवराम जाधव व इतर शेतकऱ्यांच्या २१ ऑक्टोबर २०२४च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील पाण्याचे पंप व सोलरच्या केबल चोरुन नेल्याप्रकरणी सुधाकर जाधव यांच्या फिर्यादीवरुन पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करुन तसेच तांत्रिक बाबी व गुप्त बातमीच्या आधारे नेरी दिगर येथील आरोपी शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय ४२) यास अटक केली आहे. त्याच्यकडून २० हजार रुपयांची वायर जाळून तयार केलेले तांबेचे तार जप्त करण्यात आले आहेत.

तर या गुन्ह्यात सहभागी आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे असून पहुर पोलिस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पो.नि. सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, पो.हे.कॉ. दीपक सुरवाडे, पो.ना. राहुल पाटील व ज्ञानेश्वर ढाकरे, पो.कॉ. विनोद पाटील, गोपाल गायकवाड, राहुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, राहुल महाजन यांनी केली. केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने व आरोपीस अटक केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.