नवीन बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ : महिलेचे सोन्याचे दागिने लंपास .

भाच्याचा लग्न सोहळा आटोपून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या दीपिका अजयकुमार तिवारी (वय ३२, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम वजनाचे ९५ हजार ६०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवून नेले. ही घटना सोमवार दि. २० जानेवारी रोजी नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी दि. २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील रहिवासी दीपिका तिवारी या दि. १३ जानेवारी रोजी भावाच्या मुलाच्या लग्नासाठी जळगावला आल्या होत्या. लग्नसोहळा आटोपल्यानंतर दि. २० जानेवारी रोजी त्या सिल्लोड येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. फलाटावर लागलेल्या जळगाव-वैजापूर (एमएच ४० एन ९६६८) क्रमांकाच्या बसमध्ये चढत असताना मोठी गर्दी होती.

दरम्यान, गर्दीतून माग काढत दीपीका तिवारी या बसमध्ये चढल्या. त्यांच्यासोबत असलेल्या नणंदेने दीपीका तिवारी यांना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांनी पर्समध्ये पाहिले असता त्यातून हॅण्ड पर्स दिसून आली नाही. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत दिपीका तिवारी यांच्या हॅण्ड पर्समध्ये असलेली तीन तोळ्याची सोनपोत, प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, दोन भार वजनाच्या चांदीच्या पैंजन असा ९५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.दिपीका तिवारी यांच्यासह त्यांच्या नणंदेने बसमध्ये तसेच स्थानक परिसरात हँड पर्सचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्या वेळी त्या शिवाजीनगरात भावाकडे निघून गेल्या. त्यांचे पती आल्यानंतर त्यांनी दि. २१ जानेवारी रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अलका शिंदे करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.